नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने रात्री उशीरा ECINet पोर्टलवर मोठा बदल केला आहे. नवीन मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी अथवा मतदार यादीत पहिल्यांदाच नाव नोंदवण्यासाठी भरावा लागणारा फॉर्म ६ बाबत हा बदल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या ECINet पोर्टलवर या फॉर्मसोबत एसआयआर संदर्भातील एक अतिरिक्त घोषणापत्र जोडण्यात आले होते, यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाने ज्या राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तेथील ECINet पोर्टलवरील फॉर्म ६ मधून हे वादग्रस्त घोषणापत्र हटवले आहे.आयोगाने २६ सप्टेंबर रोजी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या चारच दिवसांत हा मोठा बदल करण्यात आला आहे.
नवीन मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी किंवा मतदार यादीत प्रथमच नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म ६ भरला जातो. अलीकडेच हा फॉर्म वादात सापडला आहे, कारण निवडणूक आयोगाच्या एउखछएढ पोर्टलवर या फॉर्मसोबत एसआयआर (विशेष मतदार नोंदणी) संबंधित एक अतिरिक्त घोषणापत्र दिसू लागले होते. बुधवारी रात्री उशिरा, ज्या राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तेथील ECINet पोर्टलवरून निवडणूक आयोगाने फॉर्म ६ सोबत जोडलेले एसआयआर घोषणापत्र काढून टाकले. आयोगाचे हे पाऊल २६ सप्टेंबरच्या घोषणेनंतर चार दिवसांनी उचलण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने २६ सप्टेंबर रोजी स्पष्ट केले की, एसआयआर नसलेल्या कालावधीत मतदार नोंदणी नियम, १९६० अंतर्गत लागू असलेला सामान्य अर्ज वापरला जाईल. यानंतर, ज्या राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तेथून अर्ज ६ मधील अतिरिक्त घोषणापत्र काढून टाकण्यात आले आहे. नवीन मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी फॉर्म ६ भरावा लागतो. हा फॉर्म आधीपासूनच आहे.
एसआयआरचा याच्याशी काय संबंध?
एसआयआर म्हणजेच विशेष सखोल पुनरावलोकनादरम्यान, मतदार यादीची छाननी करून त्यात सुधारणा केली जात होती. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, एका नवीन मतदारासाठी फॉर्म ६ मध्ये एक अतिरिक्त घोषणापत्र जोडण्यात आले. निवडणूक आयोगाने याचे वर्णन मूळ फॉर्म ६ मधील बदल म्हणून न करता, Declaration/Annexure D’ असे केले. आयोगाच्या मते, एसआयआर दरम्यान हे अतिरिक्त घोषणापत्र फॉर्म ६ सोबत सादर करणे आवश्यक होते.
ECINet वर उपलब्ध असलेल्या फॉर्म ६ एसआयआरमधील घोषणापत्रानुसार, नवीन अर्जदारांना त्यांच्या जुन्या मतदार नोंदी कायम ठेवण्याचा अधिकार वापरणे आवश्यक आहे.
यामध्ये हे प्रश्न होते
मागील एसआयआर दरम्यान तयार केलेल्या जुन्या मतदार यादीत त्यांचे नाव होते का?
जर त्यांचे नाव जुन्या मतदार यादीत नव्हते, तर त्यांच्या आई-वडिलांची/आजोबा-आजींची नावे त्या जुन्या मतदार यादीत होती का?
जर त्यांच्या आई-वडिलांची/आजोबा-आजींची नावे यादीत नव्हती, तर तिसरा पर्याय निवडावा लागला.
हे घोषणापत्र नवीन आणि पहिल्यांदाच मतदान करणार्या मतदारांसाठी महत्त्वाचे ठरले होते. ज्या राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या राज्यांमध्ये फॉर्म ६ मधील हे अतिरिक्त एसआयआर घोषणापत्र यापुढे ईसीआयनेट पोर्टलवर उपलब्ध राहणार नाही. निवडणूक आयोगाच्या २६ सप्टेंबरच्या निर्णयानुसार, एसआयआर नसलेल्या कालावधीत मतदार नोंदणीसाठी फक्त मतदार नोंदणी नियम, १९६० अंतर्गत विहित केलेले फॉर्मच वापरले जातील. आयोगाने आपल्या ईसीआयनेट अॅप्लिकेशन पोर्टलवर हा बदल लागू केला आहे.